supriya Devkar.

जगणे

आयुष्य झाले कमी मज जगणे समजेना

नात्यांच्या बंधनातील मजकोडे उमगेना

कुतरओढ मनाची कशी थांबवावी कळेना

घुस्मटलेल्या भावनांना वाट मोकळी मिळेना

नात्यांमधली घालमेल कुस्करून टाकते पायदळी

विचारांना डोकावताना पाहते फक्त सोनसळी

आभासी जीवनाचा का शेवट कधी नसावा

मना जोगते जगण्याचा मज हक्क का नसावा

थोपवलेल्या भावनांचा कधी होईल निचरा

का पडद्याआड नुसता होईल त्यांचा कचरा

कसे लढावे जगण्यासाठी हातातल्या नशिबासाठी

का लागावे हात पसरण्या दोन वेळच्या भाकरीसाठी

चेहऱ्यावरील भाव करतो म्हणून जगणे निश्चयाचे

अंतरीचा मीच मग दुकान मांडतो भावनांचे

कशास हवी वृत्तीनेबळी हाती ताकद घडवण्याची

विश्वासाच्या जोरावर हिम्मत असे घडण्याची

सुप्रिया देवकर.