sameer

पराजय, माझा पराजय

पराजय, माझा पराजय

 माझा एकांतवास आणि माझा अलिप्तवास 

   तु सखा माझा,  

   हजार जयोत्सवा पेक्षा प्रिय ,

   तु सुमधुर आहेस ह्रदयात माझ्या 

....तु विश्वमहिमा पेक्षा ही प्रभुत 

 

पराजय, माझा पराजय

माझी अंतःसंज्ञा आणि माझी अवज्ञा

तु निमित्त आहेस मला अनुभुतीची ,

की आहे मी अजून तरुण व चाल चपळाई 

न गुरफटता सापळा बहुमानाचा जो लुप्त होणारा 

तुझ्यांत दडलाय उल्हास जेव्हा मी होतो बहिष्कृत व तिरस्कृत

 

पराजय, माझा पराजय

तुच आहे माझे तळपती समशेर सोबत ढाल

तुझ्या नेत्रांतुन केलं पठण

सिंहासनावर विराजमान की आपण पत्करतो दास्यत्व

अबोधाचं आविष्कार म्हणजे अस्ताव्यस्त पडझड माझ्या अस्तित्वाची

आकलन होणे म्हणजे स्वयम् प्रतिबंधित करणे

जसं पक्व फळ होत अलगदपणे भक्षण होय

 

पराजय, माझा पराजय, माझ्या पराक्रमी सखा तु

 आहेस माझ्या गीतांना श्रोता, 

 तुच साक्षीदार माझे अश्रूं व मौन

   तु आहेस जो अभिव्यक्त करतोस मला झोंबणारी वेदना तुझ्या पंखांच्या जखमांनमुळे ज्या होतात तुला

   उद्विग्न समुद्र, लालबुंद निशप्रहरी पर्वत शिखरे,

   एकमेव तु जो पादाक्रांत करी उत्तुंग व खडकाळ आत्मा माझा

 

पराजय, माझा पराजय,चिरंतन साहस

तु आणि मी निखळ हसु झंझावात वादळासंगे

मिळुन खणु थडगे आपलं, दफन व्हावं जे आपल्यात अंत पावत आहे

आणि उभे राहू उष्म भुमीवर आकांक्षा एकत्र

आणि अनावृत होऊ भयावह

 

अनुवाद :समीर खासनीस

मुळ कविता: Defeat, My Defeat- खलील जिब्रान