पर्जन्यवृष्टी

sameer

नभात दाटून आला आहे भरगच्च पाऊस छटा जणू की गडद शाई . 

 

सोंग करत लपण्याचं , सुप्त मनी ईहा घरुन करीत प्रार्थना अधिक पर्जन्यवृष्टी ची .

 

ध्वनी तो सलिलचा, ऐकू येतो मला जणू काही माझ्या नावाने उमटतो आहे प्रतिध्वनी .

 

सारेच स्तब्ध दृष्टीपात न पाहिलेल्या मुसळधार पावसामुळे .

 

वहीची पृष्ठे माझी चिंब भिजून पार दुमडून गेली, ज्यात मी नोंद करून ठेवल आहे: 

 

' तपस्वी सताड उघडे मुख ठेवून बसलेत तास अनेक ग्रहण करत पर्जन्यवृष्टी .'

 

 काळ्याशार पाण्यानं शिगोशीग भरलेलं गगनाचे वाडग, करील प्रक्षालन मुख तुमचं खळखळून .

 

पावत खिडक्या कंप ; तरल काचेला तडे पडु शकतात पर्जन्यवृष्टीत .

 

स्वयम् काळा कटोरा, वाट पाहत भरण्याची .

 

  जर उघडलं तोंड मी , तर नक्की ही पर्जन्यवृष्टी बुडवले मला.

 

  निघालो झपझप घराकडे जणू कोणी वाट पाहत आहे.

 

 रात्रमान ऐसी जैसे तुमच्या त्वचेत ती समाविष्ट होऊ पाहत आहे.

 

आहे मी पर्जन्यवृष्टी .

 

 

  • Author: Sameer (Pseudonym) (Offline Offline)
  • Published: July 29th, 2023 21:47
  • Comment from author about the poem: This is a translation of a subtle poem by Kazim Ali from the UK, I strongly felt like using it for my regional poetry lovers
  • Category: Reflection
  • Views: 2


To be able to comment and rate this poem, you must be registered. Register here or if you are already registered, login here.